Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

गरुडभरारी फाउंडेशनचा पंधरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

  गरुडभरारी फाउंडेशनचा पंधरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा. याप्रसंगी १६ राज्यस्तरीय पुरस्काराचे मान्यवरांचे उपस्थितीत वितरण. पत्रकार- सुभाष ...

 गरुडभरारी फाउंडेशनचा पंधरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा.



याप्रसंगी १६ राज्यस्तरीय पुरस्काराचे मान्यवरांचे उपस्थितीत वितरण.

पत्रकार- सुभाष भोसले कोल्हापूर :  गरुडभरारी एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा पंधरावा वर्धापन दिन सोहळा शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे रविवार दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी उत्साहात साजरा झाला . कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे हातकणगले विधानसभेचे  आमदार अशोकराव माने होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दादासाहेब लाड व ज्येष्ठ कायदेतज्ञ धनंजय पठाडे  होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती  श्रीनाथ सहकार समूह कागलचे अध्यक्ष चंद्रकांत गवळी,  गोकुळचे सहाय्यक व्यवस्थापक डॉ. टी एस कडवेकर ,  कोजिमाशि  पतसंस्था चेअरमन राजाराम शिंदे , व्हा.  चेअरमन शरद तावदारे, माजी चेअरमन डॉ.डी एस घुगरे, लोकराज्य जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास चव्हाण , जिल्हाध्यक्ष  पी के पाटील,  परिवर्तन संघटनेचे संस्थापक अमोल कुरणे, गरूडभरारी फाउंडेशनचे संस्थापक अनिल चव्हाण, कार्याध्यक्ष सुनील चव्हाण, उपाध्यक्ष  रवींद्र मोरे , ईश्वरा चव्हाण, कृष्णात सातपुते , तसेच कोजिमाशि संचालक  आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी  पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती ,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  मान्यवरांचे स्वागत व प्रस्ताविक गरुडभरारी फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी केले . यावेळी त्यांनी फाउंडेशनच्या वतीने गेल्या पंधरा वर्षात सुरू असलेले शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती सांगितली . याप्रसंगी  राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी विलास गणपती परिट (आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार ),सुरेश शामराव आडके (साहित्यभूषण),  उत्तम महादेव गवळी (आदर्श मुख्याध्यापक), सुरेश सदाशिव कुंभार (आदर्श शिक्षक ),अमित वसंत पाटील (क्रीडा रत्न), मारुती कृष्णा जाधव (समाजभूषण ),डॉ. दत्तात्रय भानुदास शिंदे (उत्कृष्ट पशुवैद्यकीय सेवा), आशा सुनील महाडिक (आदर्श सरपंच ), जावेद बादशाह अत्तार (गुणवंत शिक्षक),  राजेंद्र तुकाराम कोरे (उपक्रमशील शिक्षक),  सौ कुसुम नाथाजी राजमाने (आदर्श शिक्षिका),  अशोक शामराव चव्हाण (आदर्श सामाजिक कार्यकर्ता), अनिलकुमार रामचंद्र सपकाळे (आदर्श क्रीडाशिक्षक ),बबन महादेव पाटील (आदर्श शिक्षक), दत्तात्रय पांडुरंग पाटील (जीवन गौरव ), केसरीनंदन बहुउद्देशीय शिक्षण संस्था पेठ वडगाव संस्थापक विकास कदम   (उपक्रमशील आदर्श  शिक्षण संस्था पुरस्कार ) या  पुरस्काराने  मानपत्र, फेटा, पुस्तक व गुच्छ देऊन सत्कारमूर्तीना  मान्यवरांच्या हस्ते  गौरविण्यात आले.  प्रमुख पाहुणे  आमदार अशोकराव माने यांनी आपल्या भाषणातून गरुडभरारी फाउंडेशनच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल गौरवउद्गार काढले .  गरुडभरारी फाउंडेशनने समाजात आदर्शवत काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली आहे. सत्कारमूर्तींनीही भविष्यात आपल्या हातून अधिकाधिक समाज हिताचे कार्य करावे अशी  भावना  याप्रसंगी  आमदार अशोकराव माने यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनीही आपले विचार मांडले . गरूडभरारी फाउंडेशनने शैक्षणिक दिनदर्शिका प्रकाशन व  विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार गेली १५ वर्षे सातत्याने करून समाजाला आदर्शवत कार्य केले आहे , असे प्रतिपादन दादासाहेब लाड यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार गरुडभरारी फाउंडेशनचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले . सूत्रसंचालन एस बी कांबळे व बाळाराम लाड यांनी केले.याप्रसंगी फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सुनील चव्हाण, अशोक पाटील, अशोक तोरसे, सुधाकर डोनोलीकर , अमोल कांबळे ,सुखदेव पाटील ,कृष्णात सातपुते ,प्रमोद जाधव , सुभाष भोसले, नारायण लोहार, विनोद बागडे, डॉ.अभिजीत पाटील, जयश्री चव्हाण, हर्षद चव्हाण,  दिग्विजय भोसले, हरिष  गायकवाड , शशिकांत जाधव, सरपंच संतोष खोत , गुंगा पाटील ,संजय लोहार  आदी मान्यवर  व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments