Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

महिलांनी सौंदर्य प्रसाधनांवरील पिंक टॅक्ससाठी उठाव करण्याची गरज-डॉ.रुपाली कुलकर्णी

  महिलांनी सौंदर्य प्रसाधनांवरील पिंक टॅक्ससाठी उठाव करण्याची गरज-डॉ.रुपाली कुलकर्णी                        -सातव्या एकता मराठी साहित्य संमे...

 महिलांनी सौंदर्य प्रसाधनांवरील पिंक टॅक्ससाठी उठाव करण्याची गरज-डॉ.रुपाली कुलकर्णी

                     


 -सातव्या एकता मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादात उमटला सूर-  

अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-(दि.19/01/2025)                               

   जागतिक महासत्तेच्या गोष्टी करत असताना महिलांना आजही अनेक क्षेत्रात मुभा नसल्याची बाब खेदजनक असून महिलांसाठी खाजगी कंपन्याकडून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांवर लावण्यात येणारा पिंक टॅक्स हटविण्यासाठी महिलांनी उठाव करण्याची गरज असल्याचे मत स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाच्या प्रा.डॉ.रुपाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.त्या राष्ट्रसंत भगवान बाबा साहित्य नगरीत आयोजित केलेल्या सातव्या एकता मराठी साहित्य संमेलनातील महिला सक्षमीकरण काळाची गरज या विषयावरील परिसंवादात बोलत होत्या.या वेळी परिसंवादात कालिकादेवी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.सुधीर येवले आणि प्रा.डॉ.नवनाथ पवळे यांचा सहभाग होता.पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाल्या की,भारत हा जगाच्या पाठीवर एकमेव असा देश आहे ज्या देशाची आयडॉल भारत माता अर्थात स्त्री आहे. स्त्रीला स्वतःचा दर्जा स्वतःच उंचवावा लागणार आहे.स्त्री आणि पुरुषांमध्ये वेतन असमानता अन्यायकारक बाब असून पुरुषांच्या तुलनेत अधिक संवेदनशील आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या स्त्रीला पुरुषापेक्षा अर्धाच पगार मिळतो.ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात तर महिलांना ऊसतोडणीचे काम करता यावे यासाठी त्यांच्या गर्भपिशवी काढून टाकण्याचे काम चिंताजनक असल्याचे देखील त्या म्हणाल्या.आर्थिक प्राप्तीसाठी जर स्त्रीला आपला एखादा अवयव गमवावा लागत असेल तर आपण जागतिक महासत्तेच्या दिशेने कशी वाटचाल करू शकतो? असा प्रश्न देखील त्यांनी या परिसंवादाच्या माध्यमातून उपस्थित केला.या वेळी संमेलनाध्यक्षा प्राचार्या डॉ.दिपाताई क्षीरसागर,एकताचे संस्थापक अध्यक्ष तथा म.सा.प.संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य जेष्ठ साहित्यिक अनंत कराड,सचिव पत्रकार गोकुळ पवार, संमेलनाच्या स्वागताध्यक्षा तथा एकताच्या सल्लागार ॲड.भाग्यश्री ढाकणे,महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य बाबुराव जायभाये,जगदीश चेमटे, डाॅ.बाळासाहेब सानप,फौजी कैलास खेडकर,देवीदास शिंदे यांनी परिसंवादाचा आनंद घेतला.

No comments