Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

परभणी संविधान विटंबना सोमनाथ सूर्यवंशी व विजयदादा वाकोडे मृत्यूप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा - पँथर आर्मी

  परभणी संविधान विटंबना सोमनाथ सूर्यवंशी व विजयदादा वाकोडे मृत्यूप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा - पँथर आर्मी कोल्हापुर / पुणे :परभणी संविधान...

 परभणी संविधान विटंबना सोमनाथ सूर्यवंशी व विजयदादा वाकोडे मृत्यूप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा - पँथर आर्मी



कोल्हापुर / पुणे :परभणी संविधान विटंबना ,सोमनाथ सूर्यवंशी व विजयदादा वाकोडे मृत्यूप्रकरणाची न्यायालयीन चौकशी कराअसे आदेश  खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात दिनांक 20 डिसेंबर २०२५ रोजी दिले होते या न्यायालयीन चौकशीचे पुढे काय झाले असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी पॅंथर आर्मी स्वराज क्रांती सेनेच्या वतीने कोल्हापूर व पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले



परभणीतील संविधानाची विटंबना करणाऱ्या  इसमावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा करून कलम 176 (1A ) सीआरपीसी अन्वये या प्रकारांशी तातडीने चौकशी सुरू करावी,

पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सह इतर पोलीस अधिकाऱ्यावर कलम 32 अन्वये व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कलम 3 (1)  आणि 3 (2) प्रमाणे गुन्हे दाखल करावेत ,सोमनाथ सूर्यवंशी मृत्यस कारणीभूत असणाऱ्या पोलिस अधिकारी व तेथील जिल्हाधिकारी यांच्यावर सदोष मनुषवधाचा व गुन्हा दाखल करावा ,कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली बौद्ध वस्तीत मध्ये जाऊन मारहाण करणाऱ्या सर्व पोलिसांच्या ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई करावीत ,गेल्या काही वर्षापासून कोठडीत मृत्यूचे प्रमाण वाढत आहे एन एच आर सी डेटानुसार कस्टोडिअल डेथ मधम महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे कोठडीतील मृत्यू आणि पोलिसांच्या अत्याचाराविरुद्ध कोणताही कायदा नाही त्यामुळे कोठडीतील मृत्यू आणि पोलिसांच्या अत्याचारावरून कडक कायदे करावेतवरील सर्व मागण्यावर मुख्यमंत्री यांनी तातडीने पावले उचलून पुढील आठ दिवसात परभणी प्रकरणात न्याय द्यावा अन्यथा संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे



परभणी प्रकरणी  मागण्यांचे निवेदन पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेने च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोल्हापुर जिल्हाधिकारी व पुणे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले या वेळी कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले , समिर विजापुरे राष्ट्रीय कार्यकारी समिती प्रमुख 'सचिन रमेश माने (बापू ) महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष इचलकरंजी महानगर जिल्हाध्यक्ष अक्षय कदम , मुकेशभाई घाटगे  यांनी मागण्यांचे निवेदन दिले तर पुणे निवासी उपजिल्हाधिकारी यांना लक्मीकांत कुंबळे महाराष्ट्र प्रदेश संघटक , विजयदादा  कांबळे पुणे जिल्हाध्यक्ष . , महंमद शेख पुणे जिल्हाध्यक्ष . अल्पसंख्यांक आघाडी यांनी दिले

No comments