श्री कानिफनाथ माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात कॉफी मुक्त अभियानाची घेतली शपथ अहील्यानगर प्रतिनिधी_ बाळासाहेब कोठुळे - श्री कानिफनाथ माध...
श्री कानिफनाथ माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात कॉफी मुक्त अभियानाची घेतली शपथ
अहील्यानगर प्रतिनिधी_ बाळासाहेब कोठुळे -
श्री कानिफनाथ माध्यमिक विद्यालय व कै. रघुनाथ पा. वाघ कनिष्ठ महाविद्याल , जवखेडे खालसा दि. 20/01/2025 पासून 26/1/2025 पर्यंत इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेच्या दृष्टीने कॉफी मुक्त अभियान जनजागृती सप्ताह उत्साहात सुरू झाला आहे. सप्ताहाची सुरुवात विद्यार्थ्यांना कॉफीमुक्त शपथ देऊन झाली. यानंतर दुसऱ्या दिवशी कॉफी मुक्त जनजागृती मंडळ शिक्षा सूचीनुसार उत्तर पत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूचे व हॉल तिकीट वरील सूचनांचे वाचन व अवलोकन करण्यात आले. या सप्ताहात विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, आरोग्याची काळजी आणि आहार यासंबंधी ही माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावरील पोहोचण्याची वेळ , कॉपी केल्यास होणारी शिक्षा याचीही जाणीव करून दिली, तसेच आनंददायी व तणावमुक्त वातावरणात परीक्षा कशी द्यावी याच्याबद्दलही मार्गदर्शन केले जाईल. यावेळी प्राचार्य श्री वांढे कर एस जे,पर्यवेक्षक गिरी बी एच सर्व प्राध्यापक, शिक्षक , शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments