Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अतिग्रे येथे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

  देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अतिग्रे येथे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न  चोकाक / वार्ताहर  हातकणंगले तालुक्यातील ...

 देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अतिग्रे येथे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न 



चोकाक / वार्ताहर 


हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे आदरनीय शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवसाच्या अनुषंगाने माजी आमदार तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता राजीव आवळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य अश्या मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या यावेळी शालेय विध्यार्थी व त्यांचे पालक सर्वांनी या स्पर्धेत सहभाग घेतला ही स्पर्धा अतिग्रे फाटा ते माले फाटा दरम्यान घेण्यात आल्या स्पर्धाकांना काही अडथळा होऊ नये याची दक्षता घेत ऍम्ब्युलन्स उपलब्ध   केली होती सर्व नियोजन बद्ध उपक्रम राबवण्यात आला यामध्ये सहभागी  सुमारे 800 विध्यार्थी व 120 पालक सहभागी झाले होते यामध्ये सहभागी शाळा :- पायोनियर हायस्कूल अतिग्रे महात्मा गांधी विद्यालय रूकडी काकासाहेब आणि विद्यालय रूकडी स्वर्गीय किसनराव आवळे हायस्कूल कोरोची श्रीराम इंगवले हायस्कूल हातकणंगले फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल अतिग्रे गुरुकुल स्कूल अतिग्रे राष्ट्रसेवा हायस्कूल शिरोली, सदर स्पर्धेचे उदघाटन श्री एकनाथ पाटील, श्री ए वाय पाटील, युवा नेते राहुल आवळे, मुख्याधिपीका सौ स्मिता आवळे, आयोजक- संग्राम जाधव, सुहास मोरे, सागर मोरे, रजत शिंदे, महेश कांबळे, ललित नवनाळे, भरत रुगे, अविनाश मोरे, प्रमोद देशपांडे, विशेष मार्गदर्शन - रिंगन फौंडेशन चे श्री कोंद्रे सर, खास आकर्षण झुंबा डान्स, कृष्णात गोंदू गुपे वय वर्षे 62 यांनी सुमारे 400 कि मी सायकल स्पर्धा पूर्ण केल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच 77 वर्षीय शिवाजी पाटील यांनी देखील आपला सहभाग नोंदवला सहभाग घेणाऱ्या पालकांना खास गिफ्ट भेट म्हणून दिली तर सर्व सहभागी विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले.

No comments