Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

कै मच्छिंद्र कानडे हे सामाजिक बांधिलकीतून समाज जाणीवा जपणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते-सुभाष सोनवणे(ज्येष्ठ साहित्यिक)-मच्छिंद्र तुकाराम कानडे वय ५९ वर्ष रा.जेऊरहैबती ता.नेवासा

 कै मच्छिंद्र कानडे हे सामाजिक बांधिलकीतून समाज जाणीवा जपणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते-सुभाष सोनवणे(ज्येष्ठ साहित्यिक)-मच्छिंद्र तुकाराम का...

 कै मच्छिंद्र कानडे हे सामाजिक बांधिलकीतून समाज जाणीवा जपणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते-सुभाष सोनवणे(ज्येष्ठ साहित्यिक)-मच्छिंद्र तुकाराम कानडे वय ५९ वर्ष रा.जेऊरहैबती ता.नेवासा 




सामाजीक बांधिलकितून समाज जाणीवा संपन्न असलेले हरहुन्नरी हुशार व शांत संयमी व्यक्तिमत्व.एक प्रगतशील शेतकरी असलेले मच्छिंद्र कानडे म्हणजे, चैतन्य आनंद  शांतीमय व्यक्तिरेखा. आजही सतत नजरे समोर येणारा त्यांचा शांत करुणामय हसतमुख चेहरा खुप काही सांगुन जातो आहे. 

 सौ.इंदुमतीचे ते मोठे बंधुराज.मच्छिंद्रराव ह्या माझ्या लाडक्या मेव्हुण्याने.लहानपणा पासूनच संघर्षमय जीवन जगत प्रवास आयुष्याचा प्रवास केलेला.त्यामुळे तळागाळातील जाणीवा संपन्नतेचे त्यांना चांगले जाण भाण होते.त्यांना मानवता व निसर्ग संवर्धनाची प्रचंड आवड. पशू पालनाची आवड.बैलं ,म्हशी,गायी, कुत्रे,मांजरं हे सर्व त्यांचे खरे जीवलग मित्र.तसेच आसपास शेतात वावरणारे पक्षी,किटक हे ही त्यांचे मित्र.त्यांच्या शेतातील वस्तीवर सततच माणसांचा राबता असे.शेतशिवारातील  कष्टकरी वर्ग सह आसपासच्या गावातील अनेक जाणते मंडळी त्यांचे मित्र.... त्यांच्या कुटुंबात अध्यात्मिक वारसा असल्याने घरात सात्विकता . त्यांनी आपल्या शेत-वस्तीवर सतगुरु चैतन्य कानिफनाथ महाराजांचे मंदिर बांधलेले आहे.रोज दोन वेळा अध्यात्मिक उपासना.वर्षातून एकदा मंदिरा समोर सात दिवसाचा सप्ताह साजरा करुन.... विविध ज्ञानवंत गुणवंताचे किर्तने ,प्रवचने ठेवून अध्यात्मातील विज्ञानाचे ज्ञानदान व अन्नदान करणारे... मेव्हुणे मच्छिंद्रराव कानडे ख-या अर्थाने एक आवलीयाच होते .त्यांना एक भाऊ.... प्रा. डॉ.जालिंदर कानडे मराठी विभाग प्रमुख राजळे कॉलेज. एक बहिण सौ. इंदुमती सोनवणे दोन भाचे सुरेंद्रनाथ व किरनकुमार ,दोन मुले रविंद्र व राहुल पुतणे , ललित ,गौरव पुतणी कु.समृद्धी असा परिवार.आज त्यांच्या कुटुंबातील सर्व मुले भाचे उच्च शिक्षण घेवून पुण्यात चांगल्या क्षेत्रात नौकरी करतात. काही उच्च शिक्षण घेत आहेत. मुलगी सौ.सोनाली कांबळे ही माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांची धाकटी सून आहे. तसेच त्यांचा सर्व कानडे परिवार... सन्मा .रेवणनाथ कानडे साहेब तुरुंग अधिकारी येरवडाजेल  पुणे , प्रा. डॉ.अशोकराव कानडे इतिहास विभाग प्रमुख पाथर्डी,गोरक्षनाथ कानडे प्रगतशील शेतकरी,श्रीराम प्रगतशील शेतकरी,माधवराव कानडे पोलीस अधिकारी, संजय प्रगतशील शेतकरी , किशोर कानडे साहेब आय बी अधिकारी मुंबई शिवाजीराव कानडे माजी मुख्याध्यापक हा सर्व परिवार म्हणजे, सामाजिक बांधिलकीतून समाज जाणीवा संपन्न असलेला हारहुन्नरी मानवता व निसर्ग संवर्धनाची जाण भान असलेला परिवार आहे. यांची प्रचिती सततच पंचक्रोशीतील लोकांना येते आहे. मच्छिंद्रराव कानडे म्हणजे , चैतन्य आनंद व शांतीच.... त्यांच्या स्वभावाचे पैलू म्हणजे, *प्रेम द्यावे | प्रेम घ्यावे | प्रेम पेरावे | काळजात ||* प्रेमाळू, कनवाळू, मायाळू, दयाळू, होय.यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण कानडे परिवार नातेवाईक,आप्तेष्ट, मित्रपरिवार व पंचक्रोशीतील सर्व प्रेमाळू जण यांना एक प्रकारचा हा मानसीक धक्का बसलेला आहे. 

*होता आठवांची भेट*

*नभ डोळ्यात दाटले*  |

*येतो  फुटूनी  हुंदका*

*वाटे आभाळ फाटले* ||

आज त्यांच्या अनेक आठवणींचे काहुर अंतःकरणात दाटून येते आहे.

प्रिय मेव्हुणे मच्छिंद्रराव कानडे त्यांच्या अनेक आठवांचा  उमाळा दाटून येतो आहे.

No comments