*कु. युग विजयकुमार पाटील याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त नेर्ले गावात स्तुत्य उपक्रम: धनगरमाळ स्मशानभूमीत वृक्षारोपण, पर्यावरणाचा संदेश* को...
*कु. युग विजयकुमार पाटील याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त नेर्ले गावात स्तुत्य उपक्रम: धनगरमाळ स्मशानभूमीत वृक्षारोपण, पर्यावरणाचा संदेश*
कोल्हापूर वार्ताहर-नारायण लोहार
वाढदिवस म्हटला की सहसा केक कापणे, रोषणाई आणि आतिषबाजीचे चित्र डोळ्यांसमोर येते. मात्र, या सर्व सोहळ्यांना फाटा देत नेर्ले,ता . शाहुवाडी येथील चंद्रतारा परिवाराने एका वेगळ्या आणि कौतुकास्पद समाजोपयोगी उपक्रमाचा आदर्श घातला आहे. विजयकुमार शिवाजी पाटील आणि रूपाली विजयकुमार पाटील यांचे चिरंजीव युग याच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेर्ले येथील धनगरमाळ स्मशानभूमी परिसरामध्ये भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चिरंजीव युग चे आजोबा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील यांनी या उपक्रमाद्वारे पर्यावरणाचा संदेश दिला आहे.
विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर, मंगळवार दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९:०० ते ९:३० या वेळेत हा उपक्रम पार पडला. आजच्या काळात वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि निसर्ग संवर्धनाला गती देण्यासाठी एका चिमुकल्याच्या पहिल्याच वाढदिवशी निसर्गाला हिरवी भेट देण्याचा विधायक संकल्प चंद्रतारा ( पाटील )परिवाराने केला आहे.
स्मशानभूमी परिसराचे सुशोभीकरण व्हावे आणि तिथे निसर्गरम्य, सावली देणारी झाडे लाभावीत या उद्देशाने धनगरमाळ स्मशानभूमीच्या सभोवताली ही झाडे लावण्यात आली. "एका छोट्या रोपट्यातून उद्याच्या हिरव्यागार भविष्याची सुरुवात होते" हा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून समाजमनावर बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या शुभ व पर्यावरणपूरक प्रसंगी नेर्ले गावातील सर्व ग्रामस्थांनी, स्नेहीजनांनी व मित्रपरिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहून वृक्षारोपणाचा आनंद घ्यावा व चिमुकल्या युगला शुभाशीर्वाद द्यावेत, असे नम्र आवाहन निमंत्रक शिवाजी चंद्रू पाटील, रंगराव चंद्रू पाटील ,विजयकुमार शिवाजी पाटील व समस्त पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
पर्यावरण संवर्धनाचा हा सुंदर पायंडा निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, ग्रामस्थांमध्ये या उपक्रमाबद्दल कौतुक व्यक्त केले जात आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमास नेर्ले गावातील सुभाष जामदार( संचालक कोल्हापूर शेतकरी संघ) उद्योजक आण्णा डांगे, शिवाजी डांगे, सखाराम भणगे (राष्ट्रीय मिल मजदूर गिरणी कामगार संघ सचिव) बी. एस .पाटील, महिपती दिंडे, बबन दिंडे, आनंदराव दिंडे, आनंदराव जामदार, बाळकृष्ण पाटील (चेअरमन, विशाल दीप पतसंस्था मुंबई) दिलीप गवळी (सीनियर सुपरवायझर गोकुळ दूध संघ) दादू पाटील, पत्रकार नारायण लोहार, पत्रकार संजय पाटील, उमेश पाटील, राजेंद्र पाटील, सर्जेराव पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



No comments