सोनुर्ले गावची सुकन्या मोनिका काटकर हिचे एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश फुलेवाडी वार्ताहर -नारायण लोहार अपार कष्ट, संयम व कुटुंबाचे सहकार्य...
सोनुर्ले गावची सुकन्या मोनिका काटकर हिचे एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश
फुलेवाडी वार्ताहर -नारायण लोहार
अपार
कष्ट, संयम व कुटुंबाचे सहकार्य यामुळेच घवघवीत यश सोनुर्ले, तालुका शाहूवाडी येथील मोनिका सागर काटकर हिने (एमपीएससी) महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत यश प्राप्त केले. तिचा अनिल फ्रेंड सर्कल सोनुर्ले या तरुण मंडळांनी यथोचित सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाली ग्रामीण भागामध्ये अत्यंत चांगल्या वातावरणात मी संयमाने व कष्टाने अभ्यास केला मला या अभ्यासासाठी माझे सासरचे व माहेरचे कुटुंब यांनी सहकार्य केले. कोणत्याही क्लास शिवाय मी हे यश प्राप्त केले याबद्दल मला अभिमान आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अपयशाला खचून न जाता अभ्यास प्रामाणिकपणे करत राहावा व मनावर संयम ठेवावा तुम्हाला यशाचे हे फळ मिळतच असते यावेळी तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी हजर होते. यावेळी मंडळातील अनेक पालकांनी मोनिकाला परीक्षे संदर्भात अनेक प्रश्न विचारले त्यावेळी मोनिका काटकर यांनी समाधानकारक उत्तर देऊ मंडळातील पालकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक अण्णा पाटील सर यांनी स्वागत व आभार मानले.

No comments