पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांची बदली. नवे पोलिस अधीक्षक मा.योगेश कुमार गुप्ता.,,, प्रतिनिधी शितल कांबळे, कोल्हाप...
पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांची बदली. नवे पोलिस अधीक्षक मा.योगेश कुमार गुप्ता.,,,
प्रतिनिधी शितल कांबळे,
कोल्हापूर - कोल्हापुरचे पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांची बदली झाली असून त्यांची ठाणे येथे पोलिस उपायुक्त म्हणून रुजू होणार असून त्यांच्या ठिकाणी कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून नांदेड येथील नागरी संरक्षण हक्क पोलिस अधीक्षक मा.योगेश कुमार गुप्ता यांची वर्णी लागली आहे.
पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी 2023 साली पोलिस अधीक्षक म्हणून सुत्रे हाती घेतली होती.त्यांनी आपल्या कार्य काळात कोल्हापुर जिल्ह्यासह शहरात ठिकठिकाणी कायदा सुव्यवस्था चोख ठेवून विवीध गुन्हयांचा पर्दाफाश केला होता.त्यांचा गुन्हेगारांच्यावर एक प्रकारचा वेगळाच वचक बसवत अवैद्य व्यवसायावर अंकुश ठेवला होता.त्यांच्या कारकिर्दीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ,आंदोलने आणि मोर्चे याला कोणतेही गालबोट न लागता सुरळीत पार पाडत कायदा सुव्यवस्था चोख ठेवला होता.त्याच प्रमाणे पोलिस डिपार्टमेट मध्ये आपल्या कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर वेळीच कारवाई आणि चोख कामगिरी केलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचा वेळीच सन्मान करून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
No comments