महावितरणच्या कर्मचाऱ्यांची 'रन फॉर सेफ्टी' : विद्युत सुरक्षा सप्ताहाची उत्साहपूर्ण सुरुवात कोल्हापूर/सांगली, 31 मे 2025: महावितरणच...
महावितरणच्या कर्मचाऱ्यांची 'रन फॉर सेफ्टी' : विद्युत सुरक्षा सप्ताहाची उत्साहपूर्ण सुरुवात
कोल्हापूर/सांगली, 31 मे 2025: महावितरणच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 जून ते 6 जून या कालावधीत राज्यभरात विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने कोल्हापूर परिमंडल कार्यालयाच्या वतीने 1 जून रोजी 'रन फॉर सेफ्टी' या विशेष धावपटू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ही धावपटू सकाळी 8 वाजता कोल्हापूरच्या दसरा चौक येथून सुरू होऊन ताराबाई पार्क येथील महावितरणच्या परिमंडल कार्यालयात समाप्त होणार आहे. यामध्ये महावितरणचे कर्मचारी सहभागी होऊन वीज ग्राहकांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करतील.
अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पुढाकार:
महावितरणने मागील काही वर्षांत विद्युत अपघातांचे प्रमाण कमी करण्यात यश मिळवले आहे. तरीही काही अपघात होण्याची शक्यता असल्याने, ती शून्यावर आणण्यासाठी विद्युत सुरक्षा सप्ताह हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सुरक्षेचे शिल्पकार बनण्यासाठी कार्यरत:
"आम्ही सुरक्षेचे शिल्पकार, शून्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार" हे ब्रीद घेऊन राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांत 1 ते 6 जून या कालावधीत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रे, प्रदर्शन, रॅली, आणि इतर जनजागृती उपक्रमांचे आयोजन होईल.
सर्वांसाठी आवाहन:
महावितरणच्या या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन विद्युत सुरक्षेबाबत अधिक जाणून घेण्यासाठी व ग्राहक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
No comments