Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

चितळी पाडळी परिसरात फळबागांचे नुकसान

  पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचे आगमन चितळी पाडळी परिसरात फळबागांचे नुकसान अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी ता...

 पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचे आगमन



चितळी पाडळी परिसरात फळबागांचे नुकसान


अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी तालुक्यात काल दिनांक 19 मे रोजी सायंकाळी   वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पाथर्डी,  चांदगाव, शिरसाटवाडी, हडाळवाडी, शिरसाटवाडी , निवडुंगे या परिसरात जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यावरची झाडे मोडून पडली, काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले तर काही ठिकाणी लाईटच्या तारावरती झाडे पडल्यामुळे तारा तुटल्या व संपूर्ण तालुक्यामध्ये विजेचा खेळ खंडोबा झाला.



    चितळी पाडळी परिसरात मोठ्या प्रमाणावर फळबाग शेती असून या भागात फळबागेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. संत्रा, पपई, केळी, मोसंबी, डाळिंब या फळबागेबरोबर कांदा उत्पादकही मोठ्या प्रमाणावर या भागांमध्ये आहेत. सध्या पपईचे पीक म्हणजे हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे अन वादळी वाऱ्यामुळे निसर्गाने हिरावून घेतला. पपईची झाडे मोडून पडली. त्यामुळे फळबागाची मोठे आर्थिक नुकसान झाले तसेच तालुक्यातील कोपरे या ठिकाणी शेतामध्ये चारण्यासाठी गेलेल्या मेंढपाळाच्या मेंढ्या वरती अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज कोसळली व जागीच तीन मेंढ्यांचा मृत्यू झाला. सुदैवाणे मेंढपाळ मात्र वाचला. तसेच मांडवे, मोहोज, कौडगाव , करंजी या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर काही ठिकाणी जनावरांची शेडची पत्रे उडून गेली. पाथर्डी शहरातील मोहटा देवी रोडवरील एक जुने लिंबाचे झाड एका गिरणी वरती पडल्यामुळे गिरणीचे मोठे नुकसान झाले मात्र सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. वृद्धेश्वर फॅक्टरी परिसरात मेघगर्जनेसह जोरदार वादळी वाऱ्याचा तडाका बसला तर तिसगाव परिसरामध्ये अचानक आलेल्या वाऱ्यांमुळे ,वळवाच्या पावसामुळे बाजारपेठे मध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांची तारांबळ उडाली.

   यावर्षी उन्हाळ्यातील उष्णतेच्या लाटेमुळे प्रचंड उष्णता जाणवत होती या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली असली तरी उकडा मात्र वाढला आहे. शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीचा हंगाम या पावसामुळे सुरू होणार आहे मनस्वी शेतकरी सुखावला असला तरी फळबाग व कांदा, बाजरी पिकाच्या नुकसानीमुळे तो चिंताग्रस्त आहे.

     सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना भरपाई द्यावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांमध्ये जोर धरू लागली आहे.



चौकट

पपईच्या झाडावरती सरासरी १ क्विंटल पर्यंत माल असून वादळी वाऱ्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.

ह भ प कृष्णा महाराज ताठे

चितळी

No comments