डॉ श्री प्रदीप मानसिंगराव ढवळे UGC- NET EXAM मध्ये यश संपादन केले नुकत्याच झालेल्या UGC- NET EXAM 2024 रुकडी गावचे सुपुत्र डॉक्टर प्रदीप ...
डॉ श्री प्रदीप मानसिंगराव ढवळे UGC- NET EXAM मध्ये यश संपादन केले
नुकत्याच झालेल्या UGC- NET EXAM 2024 रुकडी गावचे सुपुत्र डॉक्टर प्रदीप मानसिंगराव ढवळे, यांनी घवघवीत यश संपादन केले असून ही परीक्षा, NTA यांच्यामार्फत घेण्यात येते. ही राष्ट्रीय स्तराची परीक्षा असून, या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. NTA ने ही परीक्षा आयुर्वेद बायोलॉजी विषयामधे प्रथमच घेतलेली आहे. आयुर्वेदिक शास्त्र या विषयात काम करण्याची आवड असणारे , डॉक्टर ढवळे हे आयुर्वेदिक एमडी असून , आयुर्वेदिक शास्त्र व आयुर्वेदिक शास्त्राची गुणवत्ता वाढ आणि त्यासाठीचे प्रयत्न हा डॉक्टर ढवळे यांचा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. त्यामुळे या संदर्भात अभ्यास व संशोधन ते सतत करत आहेत.
यूजीसी नेट परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीए द्वारे घेतली जाते. ही परीक्षा भारतीय विद्यापीठांमध्ये ज्युनियर रिसर्च फेलोशिप किंवा पीएच.डी. साठी आणि सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी पात्रता तपासण्यासाठी घेतली जाते.
आयुर्वेद जीवशास्त्राच्या क्षेत्रात अनेक फायदे होतील आणि
उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात भारताच्या पारंपारिक ज्ञानाचा समावेश करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल केवळ आयुर्वेद आणि संबंधित विषयांकडे अधिकाधिक विद्यार्थ्यांना आकर्षित करेलच, शिवाय संशोधन आणि नवोपक्रमालाही चालना देईल. यूजीसी नेट परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध संशोधन संस्थांमधून संशोधन करण्याची आणि विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये आयुर्वेद जीवशास्त्र शिकवण्याची संधी मिळेल. यूजीसीच्या या पावलामुळे आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्या, आयुर्वेदिक रुग्णालये आणि संशोधन संस्थांमध्येही रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना डॉक्टर ढवळे म्हणाले आयुर्वेदाची मुळतत्वे हि फार खोल विचारांनंतर तयार करण्यात आलेली आहेत. मानवी शरीराचं संपूर्णतः आकलन करूनच हि तत्व स्थापित केलेली आहेत. निसर्गाबरोबर समरस होऊन जीवनपद्धती अंगीकारायची आणि व्याधिमुक्त होण्यासाठी नैसर्गीक घटक वापरायचे हाच आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचा गाभा आहे. पण दुर्दैवाने बर्याचवेळा या चिकित्सा पद्धतीकडे पौराणिक किंवा ऎतिहासिक शास्त्र म्हणून पहाण्यात येते. या मागे मुख्यत्वेकरून असलेले कारण म्हणजे आताच्या विज्ञानाला पुराव्यासाठी त्यांच्या भाषेत आणि त्यांनी ठरवलेल्या साच्यात माहिती हवी असते. आणि हि माहिती मोठ्याप्रमाणात आयुर्वेद उपचार करणाऱ्यानकडे उपलब्ध नसल्याने या शास्त्राला जागतिक स्तरावर लोकमान्यता मिळण्यास अडचणी येत आहेत. ह्याच कारणामुळे कदाचित या आयुर्वेदिक तत्वानां आणि आत्ताच्या काळामधे सुध्दा प्रभावी औषध उपचार पद्धती म्हणुन सिद्ध करण्यासाठी आधुनिक जीवशास्त्रीय विज्ञानांचा आधार घ्यावा लागत आहे. परत एकदा काळाच्या कसोटीवर हे शास्त्र घासून पुसून घेण्यात येत आहे. असे मत डॉक्टर ढवळे यांनी व्यक्त केले,
त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
No comments