MPSC क्लर्क 2023 चा निकाल संदर्भात श्री दत्तात्रय भरणे मामा (क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री) यांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. त्यांनी पूर्...
MPSC क्लर्क 2023 चा निकाल संदर्भात श्री दत्तात्रय भरणे मामा (क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री) यांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. त्यांनी पूर्ण विषय ऐकून मुख्यमंत्री महोदयांबरोबर या संदर्भात पाठपुरावा करतो असे आश्वासन दिले.
यासंबंधी सविस्तर माहिती अशी की
"MPSC च्या संथ गतीच्या कारभारामुळे होतकरू परीक्षार्थ्यांमध्ये तणावाची लाट"
: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट क भरती प्रक्रिया संथ गतीने होत असल्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल 15,000 हून अधिक उमेदवार या प्रक्रियेमध्ये अडकले असून, नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांचे भविष्य अधांतरी आहे. आयोगाने वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी विद्यार्थ्यांची शासनाकडे मागणी आहे.
जानेवारी २०२३ मध्ये या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा ३० एप्रिल २०२३ रोजी, मुख्य परीक्षा १७ डिसेंबर २०२३ रोजी, तर कौशल्य चाचणी ४ जुलै ते १३ जुलै २०२४ दरम्यान पार पडली. कौशल्य चाचणीचा निकाल ३० सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर झाला. मात्र, अतिशय संथ गतीच्या कारभारामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास विलंब झाला आहे.
सध्या लिपिक टंकलेखकांच्या ७,००० पदांसह ४०० हून अधिक कर सहाय्यक पदाची भरती प्रक्रिया रखडलेली आहे.
निवड प्रक्रिया रखडल्यामुळे परीक्षार्थी व त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा मानसिक ताण निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांची मागणी:
१. न्यायालयीन प्रक्रियेस गती देण्यासाठी ठोस पावले उचलावीत.
२. संबंधित प्रशासकीय विभागांशी समन्वय साधून लवकरात लवकर अंतिम निकाल जाहीर करावा.
या संदर्भात विद्यार्थ्यांनी मा. मुख्यमंत्र्यांना तसेच इतर मा. मंत्री, आमदार यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली असून त्वरित कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
No comments