शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर व समाजोपयोगी कार्याचे आयोजन भिवंडी: शिवजयंती निमित्त, युनिक ब्लड मोटीव्हेटर्स आणि स्वागत मित्र मंडळ यांच्या स...
शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर व समाजोपयोगी कार्याचे आयोजन
भिवंडी: शिवजयंती निमित्त, युनिक ब्लड मोटीव्हेटर्स आणि स्वागत मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ३०० युनिट रक्तदानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे अजय भानूशाली सर (रस्ते वाहतूक सेना, भिवंडी लोकसभा अध्यक्ष) आणि अनिल बेलेकर यांनीही रक्तदान करून समाजासाठी आदर्श निर्माण केला.
कार्यक्रमात युनिक ब्लड मोटीव्हेटर्सच्या अध्यक्षा सौ. सुनिता खैरनार यांनी रक्तदात्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन दिले. रक्तदान करणाऱ्या अजय भानूशाली सर, अनिल बेलेकर यांचा सौ. सुनिता खैरनार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमामध्ये विशाल बारनीस यांचे खूप मोठे योगदान होते. त्यांनी रक्तदान शिबिराचे व्यवस्थापन, रक्तदात्यांचे प्रोत्साहन आणि आश्रमातील सामाजिक उपक्रमांच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावली.
विशाल बारनीस यांनी आधारवड व नवज्योत आश्रम येथे १०० समोसे व १०० बिस्किटांचे वाटप करून गरजूंना सहाय्याचा हात पुढे केला. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे कार्यक्रम अधिक यशस्वी झाला.
कार्यक्रमात रामेश्वर खरुले आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफने रक्तदानासाठी सक्रिय सहभाग नोंदवला. रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष ब्लड कॅप्स वितरित करण्यात आल्या, ज्यामुळे "रक्तदान हेच जीवनदान" हा संदेश प्रभावीपणे पोहोचवला गेला.
शिवजयंतीचा उत्सव केवळ साजरा करण्यापुरता न ठेवता, समाजोपयोगी कार्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, या उपक्रमासाठी योगदान दिलेल्या सर्व रक्तदात्यांचे, आयोजकांचे आणि विशेषतः विशाल बारनीस यांचे विशेष आभार मानले गेले.
"रक्तदान हेच जीवनदान" या संदेशासह, शिवजयंती सण समाजसेवा व परोपकाराने साजरा करण्याचा आदर्श या कार्यक्रमाने उभा केला.
No comments