श्रीरामपूरमधील कराटे चॅम्पियन्सचे यश अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- : वर्ल्ड फुनाकोशि शोटोकान कराटे ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून ३०व...
![]() |
श्रीरामपूरमधील कराटे चॅम्पियन्सचे यश |
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- : वर्ल्ड फुनाकोशि शोटोकान कराटे ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून ३०वी खुली युगो- आशिया इंटरनॅशनल कराटे स्पर्धा मुलुंड येथील प्रियदर्शनी स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये पार पडली. यात श्रीरामपूरमधील मार्शलभार्ट ॲकॅडमीतील १८ खेळाडूंनी सहभाग घेतला आणि त्यांनी अनेक पदके मिळवली.
या स्पर्धेत भारतासह इंग्लंड, माॅरेशिअस, सौदी अरेबिया, मलेशिया, इस्त्राईल, श्रीलंका, नेपाळ आणि इतर अशा १० देशातील २००० स्पर्धकांनी भाग घेतला होता. श्रीरामपूर येथील शां.ज.पाटणी विद्यालय (मॉर्डन हायस्कुल) येथील गौतम दे मार्गदर्शनाखाली १८ विदयार्थ्यांनी गौतम् दे यांच्या भाग घेतला. उदय बोरुडे, नबीन सुनार, आदर्श शिंदे, अंकन दे, कल्यानी देसाई, आर्नव नेरकर, आरोही मानकर, वैभव गिरी आणि हर्षराज साळवे या खेळाडूंना गोल्ड मेडल मिळाले. श्रेयस देव्हारे, आदित्य दुधे रिद्धीमन बहालकर, मान्यता सोनावणे आणि सिद्धी खंडागळे या खेळाडून सिल्व्हर मेडल मिळाले. आदित्य झिने, प्रिती दे, वेदांत पांडे आणि कार्तिक पाचारणे या खेळाडूंना ब्रांझ मेडल मिळाले.
No comments