Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

एकता फाउंडेशन च्या राहुरी तालुका शाखेचे उद्घाटन थाटात संपन्न

  एकता फाउंडेशन च्या राहुरी तालुका शाखेचे उद्घाटन थाटात संपन्न  (जिल्ह्यातील कवींचे रंगले काव्य संमेलन ) पाथर्डी प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-...

 एकता फाउंडेशन च्या राहुरी तालुका शाखेचे उद्घाटन थाटात संपन्न 



(जिल्ह्यातील कवींचे रंगले काव्य संमेलन )



पाथर्डी प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे--वेदनेला फुंकर माणुसकीची हे ब्रीदवाक्य घेऊन गेल्या दशकापासून राज्यभर काम करणाऱ्या एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या राहुरी तालुका शाखेचा उद्घाटन समारंभ राहुरी शहरातील अहिल्याभवन येथे कवी यशवंत पुलाटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. यावेळी उद्घाटक म्हणून एकता चे संस्थापक अध्यक्ष तथा म.सा.प.संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, जेष्ठ साहित्यिक अनंत कराड आणि प्रमुख अतिथी म्हणून एकताचे प्रदेश प्रवक्ता मल्हारी खेडकर, प्रदेश संघटक देवीदास शिंदे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पत्रकार बाळासाहेब कोठुळे, दत्तात्रय निर्मळ यांची उपस्थिती होती तसेच एकताचे पाथर्डी तालुकाध्यक्ष कवी राजेंद्र उदारे व शेवगाव तालुकाध्यक्ष प्रदीप बोडखे यांनी शुभसंदेश पाठवून एकताच्या राहुरी तालुका कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

         यावेळी एकता फाउंडेशन च्या स्थापनेची भुमिका स्पष्ट करतांना अनंत कराड म्हणाले की, 'समाजातील जातीभेद, धर्मभेद, विषमता, असमतोल नष्ट व्हावा, समाजाची शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक आणि पर्यावरणीय उत्क्रांती व्हावी, एकमेकांतील बंधुभाव, स्नेह, एकात्मता वृद्धिंगत व्हावी म्हणून एकता फाउंडेशन ची स्थापना करण्यात आली असून आजपर्यंत एकताने आपल्या उद्दीष्ट आणि तत्त्वांशी कधीही तडजोड केलेली नाही.' कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवीवर्य देवीदास शिंदे यांनी केले. याप्रसंगी दत्तात्रय निर्मळ, यशवंत पुलाटे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत आरोग्याचा मंत्र दिला. उद्घाटन सोहळ्यानंतर प्रा.डाॅ.राजेंद्र कोबरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कवींचे काव्य संमेलन संपन्न झाले. यात अनंत कराड, यशवंत पुलाटे, देविदास शिंदे, ज्ञानेश आकसाळ, मल्हारी खेडकर, सुरेश आढाव, शैला मुन्तोडे बाळासाहेब कोठुळे यांनी एकसे बढकर एक रचना पेश करत कार्यक्रमात धमाल उडवून दिली. निवृत्ती महाराज कानवडे (संगमनेर) यांनी वासुदेवाची वेशभूषा परिधान  करत लोककलेची महती सांगणारी रचना पेश करून साहित्य रसिकाचा आनंद द्विगुणित केला तर ग्रामीण कवी  बाळासाहेब मुन्तोडे यांनी सभागृहात थेट घोडे आणत 'बिऱ्हाड घोडीवरचं' हे संवेदनाशील काव्य उपस्थितांसमोर सादर केले. ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड यांनी       'केरसुणी' या रचनेतून भूतकाळ व वर्तमानकाळाची खुमासदार शब्दात सांगड घालण्याचा प्रयत्न केला तर बाळासाहेब कोठुळे यांच्या राजकारणावरील वात्रटिका व त्यातील खोचक शब्द वास्तवाचा प्रत्यय देणारे होते. मल्हारी खेडकर यांनी सुद्धा बहारदार रचना सादर करून उपस्थित रसिकांचे लक्ष वेधून घेतले. या संपूर्ण काव्य संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन पत्रकार बाळासाहेब कोठुळे यांनी करत कार्यक्रम एका उंचीवर नेऊन ठेवला.

        [चौकट- राहुरी तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी - से.निवृत्त मुख्याध्यापक रघुनाथ पारखे (अध्यक्ष), अदिनाथ गाडे (उपाध्यक्ष), बाळासाहेब मुन्तोडे (सचिव), विजय तमनर (सल्लागार), निवृत्ती आढाव (कोषाध्यक्ष), मधुकर पवार (संघटक), डाॅ.देवेंद्र शिंदे (प्रसिद्धीप्रमुख), सदस्य- श्रीम.शैला मुन्तोडे, मधुकर घाडगे, विठ्ठल धायगुडे, आयाज देशमुख, सोपान विटनोर, कारभारी मकासरे यांची एकता कोअर कमिटीने निवड केली. कार्यक्रमाला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसह राहुरी तालुक्यातील अनेक साहित्यप्रेमी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व महिला भगिनी यावेळी उपस्थित होत्या.]

No comments