Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

चितळी मध्ये सप्ताह नियोजनाची बैठक संपन्न-

 चितळी मध्ये सप्ताह नियोजनाची बैठक संपन्न- पाथर्डी प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी तालुक्यामध्ये चितळी या गावी सालाबाद प्रमाणे गावचे श्रद...

 चितळी मध्ये सप्ताह नियोजनाची बैठक संपन्न-



पाथर्डी प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी तालुक्यामध्ये चितळी या गावी सालाबाद प्रमाणे गावचे श्रद्धास्थान असलेले बजरंग बली देवस्थान जन्मोत्सवाच्या दिवशी सप्ताहाची सांगता होते म्हणजेच पाच एप्रिल रोजी सप्ताहाची सुरुवात होते दुसऱ्या दिवशी श्री प्रभू राम जन्मोत्सव व पौर्णिमेला हनुमान जयंती उत्सव कार्यक्रम साजरा करण्याची परंपरा गेली 30-40 वर्षापासून ग्रामस्थांनी जपली आहे ह भ प रघुनाथ महाराज उंबरे कर यांनी घालून दिलेला आदर्श व ह भ प वैकुंठवासी रघुनाथ महाराज गोंदवणे यांनी दिलेला अध्यात्मिक संस्कार आजही तेवढ्याच ताकतीने ग्रामस्थ पुढे नेत आहेत ह भ प उद्धव महाराज ढमाळ व कृष्णा महाराज ताठे व ह भ प उद्धव महाराज जाधव यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने भगवंताचे कार्य चितळीचे ग्रामस्थ मोठ्या भक्ती भावाने करत आहे या कार्यक्रमाच्या नियोजनास मोठ्या आर्थिक बाबी पूर्ण करण्यासाठी अगोदर नियोजनाची बैठक सलाबादप्रमाणे ग्रामस्थांच्या उपस्थितीत दरवर्षी संपन्न होत असते यावर्षी ह भ प उद्धव महाराज ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 10 जानेवारी रोजी गणपती मंदिरासमोर बैठक संपन्न झाली यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे बाळासाहेब ताठे सर सुनील शिंदे उद्धव महाराज जाधव कृष्णा महाराज ताठे अशोक ढमाळ बाबासाहेब ताठे अनिल ढमाळ आदिनाथ आमटे अनिल आमटे नितीन कदम कांताराम भालेराव सर्जेराव आमटे बंडू वाणी विठ्ठल कोठुळे अजित ताठे चंद्रकांत ताठे शरद ढमाळ संतोष कदम अनिल कोठुळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

  यावेळी ढमाळ महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले गावातील तरुणांनी आपले विचार अध्यात्माच्या व्यासपीठावर मांडली पाहिजे तसेच लोकवर्गणीच्या माध्यमातून उभा राहिलेल्या निधीमधून मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम आपण दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचे करत असतो समाजाने दिलेल्या वर्गणीच्या पैशातून सामाजिक बांधिलकीला जपत आपण काही सामाजिक काम करत आहोत व तो पैसा सत्कार यासाठी वापरला जातो तसेच कृष्णा महाराज ताठे म्हणाले संतांच्या विचाराची अवलोकन सामान्य माणसाला करता यावी व त्यातून त्याचे जीवनमान बदलावे यासाठी सप्ताह मधून प्रवचन कीर्तन अशी कार्यक्रम आपण घेत असतो बाबा आमटे यांनी राजकारणातल्या कुठल्याही व्यक्ती यामध्ये प्रत्यक्षात दिसणार नाही परंतु गावातील युवकांनी या भगवत भक्तीच्या कार्यक्रमांमध्ये योगदान द्यावे अशी आवाहन केले तसेच कार्यक्रमासाठी रुपये पंधराशे लोक वर्गणी जाहीर केली यावेळी बाळासाहेब ताठे सर बाबा आमटे अनिल आमटे जाधव महाराज कृष्णा महाराज ताठे अशोक ढमाळ शरद ढमाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले व बाबा आमटे यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपला अशी जाहीर केली

No comments