फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वर्धापन दिनानिमित्त कडूबाई खरात यांच्या कार्यक्रमाचे माले येथे आयोजन हेरले प्रतिनिधी संदीप कोले हात...
फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वर्धापन दिनानिमित्त कडूबाई खरात यांच्या कार्यक्रमाचे माले येथे आयोजन
हेरले प्रतिनिधी संदीप कोले
हातकणंगले तालुक्यातील माले येथे फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच, माले यांच्या वतीने वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त निःशुल्क संगितमय प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या सुमधुर आवाजात भीमगीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.
हा कार्यक्रम २४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं. ७.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिडांगण, संयुक्त आंबेडकर चौक, माले येथे होणार आहे.
सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संगीतमय प्रबोधनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
No comments