Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त क्रीडा व सांस्कृतिक स्नेहसंमेलन संपन्न

  कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त क्रीडा व सांस्कृतिक स्नेहसंमेलन संपन्न कोल्हापूर प्रतिनिधी: सागर शेळके (संपादक, योगदान प...

 कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त क्रीडा व सांस्कृतिक स्नेहसंमेलन संपन्न



कोल्हापूर प्रतिनिधी: सागर शेळके (संपादक, योगदान पोर्टल न्यूज)

कोल्हापूर: महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रउद्योग विभागाच्या वतीने, तसेच विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त आयोजित क्रीडा व सांस्कृतिक स्नेहसंमेलन कोल्हापुरात दिमाखात पार पडले. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

कार्यक्रमात कोल्हापूरचे सुपुत्र नीलेश दिनकर पाटील (राशिवडे) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृहाला थक्क केले. शिवरायांच्या दमदार एंट्रीच्या वेळी उपस्थितांनी "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. त्यांच्या कलाप्रदर्शनाने सर्वांची मने जिंकली आणि उपस्थितांनी त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले.



कार्यक्रमात क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, तसेच सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले. या स्नेहसंमेलनाने सहकार क्षेत्रातील एकात्मता आणि कला व क्रीडा क्षेत्रातील युवकांच्या सहभागाची झलक दाखवली.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.

No comments