करवीर पोलिस ठाण्यात स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न कोल्हापूर, 19 जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षप्रेमी ऑर...
करवीर पोलिस ठाण्यात स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर, 19 जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशनच्या वतीने आज करवीर पोलिस ठाणे परिसरात स्वच्छता मोहीम, परिसर सुशोभीकरण आणि निसर्ग संपन्नतेसाठी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात कसबा बावडा रणरागिणी महिला ग्रुपनेही सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमात वड, पिंपळ, कडुलिंब, बूच, करंज, पडळ, करमळ, गुळभेंडी, सप्तपर्णी यांसारख्या उपयुक्त व औषधी झाडांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी आणि परिसर स्वच्छतेसाठी घेतलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.
कार्यक्रमावेळी करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक, अधिकारी, पोलीस कर्मचारी, वृक्षप्रेमी संस्थेचे सदस्य, प्रिवेल ग्रुप, रणरागिणी महिला ग्रुप सदस्य तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. यामध्ये सविता पाटील, लिना यादव, शुभांगी देशमुख, सोनल सातपुते, अनुराधा देसाई, गायत्री गौंडर यांचा सक्रिय सहभाग होता.
पत्रकार प्रथमेश चव्हाण यांनीही कार्यक्रमाचे प्रतिनिधित्व करून वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशनच्या या सामाजिक उपक्रमाची मांडणी केली.
या कार्यक्रमामुळे परिसरात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली. वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशनच्या या उपक्रमामुळे निसर्ग जतनासाठी नवचैतन्य निर्माण झाले आहे.
No comments