Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

युवक हे सशक्त भारताचे आधारस्तंभ- मा. श्री. आर. वाय. म्हस्के

 *युवक हे सशक्त भारताचे आधारस्तंभ- मा. श्री. आर. वाय. म्हस्के* अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)- युवकांनी आदर्श व्यक्तिमत्त्वांचे विच...

 *युवक हे सशक्त भारताचे आधारस्तंभ- मा. श्री. आर. वाय. म्हस्के*



अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-

युवकांनी आदर्श व्यक्तिमत्त्वांचे विचार अंगीकारल्यास ते जीवनात यशस्वी होतील असे मत शिवाजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री. आर. वाय. म्हस्के यांनी व्यक्त केले. ते दादापाटील राजळे महाविद्यालयात युवक दिनानिमित्त आयोजित राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, कृषी क्रांतीचे सेनानी डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे पुण्यस्मरण, सहकार महर्षी स्वातंत्र्यसैनिक स्व. भाऊसाहेब थोरात यांची जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. ते म्हणाले युवक हे देशाभिमानी असावेत त्यांचे विचारसरणी, त्यांची शरीरयष्टी योग्य असावी असेच युवक सशक्त भारताचे आधारस्तंभ होऊ शकतात. विवेकानंदांमधील निर्भीडपणा, कष्ट करण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी. त्यांनी सांगितले की अहमदनगर जिल्ह्याच्या व भारताच्या विकासाच्या दृष्टीने तसेच हरितक्रांतीच्या निर्णयात स्व. अण्णासाहेब शिंदे यांचे महत्त्वाचे योगदान होते. अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागापर्यंत सहकारी चळवळ पोहोचवण्यासाठी व अहमदनगर सहकारी बँकेच्या वाढीसाठी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मा. श्री. अमोल पाटील हे होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, या महान विभूतींचे विचार कायमच समाजाला मार्गदर्शक आहेत. यांच्या विचारांमुळे समाजात नवचैतन्य निर्माण होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर यांनी केले. याप्रसंगी त्यांनी राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, स्व. डॉ. अण्णासाहेब शिंदे, स्व. भाऊसाहेब थोरात व स्व. दादापाटील राजळे यांचे जीवन कार्याचा आढावा घेतला. तरुणांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे असा संदेश त्यांनी प्रास्ताविकातून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. क‍िशोर गायकवाड यांनी केले तर आभार डॉ. आसाराम देसाई यांनी मानले. या कार्यक्रम प्रसंगी कासार पिंपळगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मा. श्री. वसंतराव भगत, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्र निकेतनचे प्राचार्य मा. श्री. सुनिल पानखडे, कार्यालयीन अधिक्षक विक्रमराव राजळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे  प्रा. अशोक काळे, डॉ. महेबुब तांबोळी, डॉ. जनार्धन नेहुल व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दुर्गा भराट, प्रा. अस्लम शेख, प्रा. अर्चना नवले प्रा. अंजुम सय्यद यांनी परिश्रम घेतले.

No comments