Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

दादापाटील राजळे महाविद्यालयाचा करिअर संसदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात सहभाग*

 * दादापाटील राजळे महाविद्यालयाचा करिअर संसदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात सहभाग* अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)- महाराष्ट्र राज्य उच्...

 *दादापाटील राजळे महाविद्यालयाचा करिअर संसदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात सहभाग*



अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रमांतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालय येथे दिनांक १२ व १३ जानेवारी, २०२५ रोजी संपन्न झाले. या अधिवेशनास दादापाटील राजळे महाविद्यालयामधून करिअर कट्टा समन्वयक डॉ. अतुलकुमार चोरपगार व प्रा. चंद्रकांत पानसरे आणि करिअर संसदचे ०८ पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष मा.आ.आप्पासाहेब राजळे, शेवगांव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे,विश्वस्त मा. राहुलदादा राजळे,सचिव मा. आर.जे. महाजन व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर, अधिक्षक श्री विक्रम राजळे आणि सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. या अधिवेशनाचे उद्घाटन एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या विश्वस्त सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. या करिअर संसद अधिवेशनात विविध क्षेत्रातील राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय नामांकित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना नोकरी व उद्योग क्षेत्रासोबत कृषि क्षेत्रात होत असलेले बदल माहीती व्हावी यासाठी बारामती येथील कृषक प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी भेट आयोजित करण्यात आली. यामध्ये ए. आय. तंत्रज्ञान वापरून शेती कशी करता येते याचे प्राचक्षिक सादर केले तसेच विविध छोठ्या उद्योगांची माहिती मिळाली. करिअर संसद अधिवेशनाने केवळ ज्ञानच दिले नाहीं तर स्वतःवर विश्वास ठेवण्याची प्रेरणाही दिली अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. या अधिवेशनसाठी महाविद्यालय करिअर संसदेच्या कु. गायत्री साठे, सोनल दगडखैर, वृषाली भोसले, साक्षी कोठुळे, साक्षी वराट, साक्षी बोरूडे, अजिंक्य पुरी व शाहिद शेख या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत विविध बक्षिसे प्राप्त केली. याबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

No comments