Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

श्री.प्रमोद सावंत यांचा सत्कार करताना संस्था अध्यक्ष मनोहर दळवी,मधुकर परब,ही एस सावंत,अरुण म्हाडगुत,सरपंच सौ.सावंत, मुख्याध्यापक दिलीप शेवाळकर ,आर आर सावंत

 न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरुर विद्यालयाचे श्री. प्रमोद श्रीधर सावंत यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न कोल्हापूर प्रतिनिधी-नारायण लोहार ...

 न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरुर विद्यालयाचे श्री. प्रमोद श्रीधर सावंत यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी-नारायण लोहार


    न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या विद्यालयाचे लिपिक श्री. प्रमोद श्रीधर सावंत हे नियत वयोमानानुसार दिनांक 31-12-2024 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांना निरोप व शुभेच्छा कार्यक्रम विद्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ईशस्तवन व स्वागत गीत झाले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रमोद सावंत यांच्या आठवणी विशद केल्या. नंतर मुख्याध्यापक शेवाळकर सर यांनी प्रास्ताविक व शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर सेवानिवृत्त शिक्षक लोहार सर, मेस्त्री सर, कांबळे सर, कोराने सर, सी एस सावंत सर यांनी प्रमोद सावंत यांच्या कार्याची महती विशद केली. नरडवे हायस्कूल नरडावे या विद्यालयाचे चेअरमन श्री. मुंडले, माजी उपसभापती कणकवलीचे संतोष कदम यांनीही प्रमोद सावंत च्या कार्याचा आढावा घेतला.

 अनेक वक्त्यांनी प्रमोद सावंत यांच्या सुंदर हस्ताक्षर, अचूक शालेय दप्तर, संयम या गुणांचा उल्लेख केला. कार्यालयीन वेळेच्या बाहेर शाळेचे काम करणारे प्रमोद सावंत यांचा गौरव करण्यात आला.

 प्रमोद सावंत यांनी आपले सुंदर हस्ताक्षर असण्याचे प्रमुख कारण आपले वडील श्रीधर सावंत हे दररोज पाच ओळी शुद्धलेखन लिहून घेत होते म्हणूनच आपले हस्ताक्षर सुंदर आहे हे आवर्जून सांगितले. येथून पुढे शाळेला गरज वाटेल तेव्हा मी मदत करण्यास तयार असल्याचे अभिवचन दिले.

    या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मनोहर दळवी, उपाध्यक्ष वसंत दळवी, संचालक सी एस सावंत, अरुण म्हाडगुत, आर आर सावंत, मधुकर परब तसेच नरडवे हायस्कूलचे चेअरमन सुरेश मुंडे, संतोष कदम, प्रमोद सावंत यांचे भाऊ बहीण व इतर नातेवाईक उपस्थित होते.

  त्याचबरोबर सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल मेस्त्री, नारायण लोहार, माजी मुख्याध्यापक गुंडू कांबळे, शंकर कोराणे, हळदीचे नेरुर पंचायतीच्या सरपंच सौ. सावंत याही उपस्थित होत्या. पालकांचीही उपस्थिती होती. नेरुर कर्याद नारूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोहर दळवी यांनीही प्रमोद सावंत यांच्या कार्याबद्दल गौरवोदगार काढले. शेवटी शाम निकम यांनी आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर नाईक यांनी सुंदर रीत्या केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.


No comments