प्रशासकीय कामकाजात कागल तालुका अव्वल होण्यासाठी मुख्याध्यापकांची भूमिका महत्त्वपूर्ण- गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे पत्रकार- सुभाष भोसले ...
प्रशासकीय कामकाजात कागल तालुका अव्वल होण्यासाठी मुख्याध्यापकांची भूमिका महत्त्वपूर्ण- गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे
पत्रकार- सुभाष भोसले
कागल तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापकांची दौलतराव निकम विद्यालयात झालेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती म्हणून विस्ताराधिकारी रामचंद्र गावडे व संजय कुकडे होते.
गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांनी कागल तालुक्यातील आधार वैद्यता, अपार आयडी,शालेय पोषण आहार,शिष्यवृत्ती परीक्षा, विविध शालेय उपक्रमांची अंमलबजावणी,अभिलेख वर्गीकरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या सर्व कामकाजात कागल तालुक्यातील मुख्याध्यापकांनी सकारात्मक भूमिका घेऊन अद्यावत राहण्याचे आवाहन केले. या बैठकीत तालुक्यातील सर्व शिक्षकांची झिरो पेंडन्सी ठेवल्याबद्दल मुख्याध्यापकांनी समाधान व्यक्त केले.
कागल तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनाबाबत रामचंद्र गावडे यांनी मार्गदर्शन केले.कागल तालुक्याचे यावर्षीचे विज्ञान प्रदर्शन महात्मा फुले विद्यालय बेलवळे बुद्रुक येथे निश्चित करण्यात आले.
या कार्यशाळेला तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, विषय तज्ञ,१२१ प्राथमिक शाळा मुख्याध्यापक,७० माध्यमिक शाळा मुख्याध्यापक उपस्थित होते. कागल तालुका मुख्याध्यापक संघाचे अनिल खामकर,अशोक बुगडे, केंद्रप्रमुख सुनिता किणीकर, राजश्री चौगुले,ए.एम.पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
स्वागत केंद्रप्रमुख एस.व्ही.पाटील यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांनी केले.सूत्रसंचालन जे.एन.सावंत यांनी तर आभार संजय दाभाडे यांनी मानले.
No comments