महाराष्ट्राच्या विधानसभेत "अमित"पर्व येण्यासाठी उबाठा गटाच्या पाठिंब्याची मनसेला आवश्यकता नाही.. . बांद्राच्या युवराजला वरळी विध...
महाराष्ट्राच्या विधानसभेत "अमित"पर्व येण्यासाठी उबाठा गटाच्या पाठिंब्याची मनसेला आवश्यकता नाही...
बांद्राच्या युवराजला वरळी विधानसभेत पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांच्या पायपुसनीचे शिलेदार आता अमित ठाकरे जर माहीम विधानसभेतून निवडणूक लढवत असतील तर आम्ही माहीममध्ये उमेदवार देणार नाही,अश्या प्रकारच्या बातम्या जाणूनबुजून समाज माध्यमावर फिरवत आहे. जेणेकरून माननीय राजसाहेब वरळी विधानसभेत पुन्हा एकदा चांगुलपणाच्या भावनेतून युवराजविरुद्ध उमेदवार देणार नाहीत आणि युवराजचा विजयी होण्याचा मार्ग मोकळा होईल,अशी त्यांची अपेक्षा असावी.पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मागच्या विधानसभेत पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील कोणीतरी निवडणुकीला उभे राहत असल्याने राजसाहेबांनी आपल्या पुतण्यासाठी एक पाऊल मागे येत उमेदवार दिला नव्हता. या अगोदरपण अशीच चांगली बाजू राजसाहेबांनी वेळोवेळी उध्दव ठाकरे व त्यांच्या पक्षासाठी अनेकवेळा आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे.आपल्या सर्वांना आठवत असेल की, जेव्हा ठाणे महानगर पालिकेत सेनेच्या सत्तेसाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काही नगरसेवकांचा पाठिंबा कमी पडत होता, त्यावेळीच्या सेनेत असलेले श्री.एकनाथ शिंदे व श्री.प्रताप सरनाईक हे मातोश्रीच्या आदेशावरून राजसाहेब यांना भेटायला आले असता, कोणतीही इच्छा किंवा अपेक्षा न ठेवता मोठ्या मनाने "बिनशर्त पाठिंबा" दिला होता. उध्दव ठाकरे यांच्यावर बायपास सर्जरी झाल्यानंतर स्वतः राजसाहेब हे गाडी चालवत हॉस्पिटल ते मातोश्री उध्दव ठाकरे यांना घेऊन आल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. उध्दव ठाकरे पक्षप्रमुख व्हावेत याचा प्रस्ताव महाबळेश्वर अधिवेशनात स्वतः राजसाहेब ठाकरे यांनीच मांडला होता आणि त्याअगोदर उध्दव ठाकरे हे पूर्णपणे राजकारणातपण आलेले पण नव्हते.नुकतीच त्यांची त्यावेळी राजकारणात सुरुवात झाली होती. राजसाहेब यांना तर त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र ओळखत होता कारण ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झाले होते व महाराष्ट्र संपूर्ण पिंजून काढून शिवसेना पक्ष मोठा व्हावा यासाठी रात्रंदिवस काम करीत होते. जेव्हा भाजप ने पहिल्यांदा शिवसेनेसोबत असलेली युती तोडली, तेव्हा पण राजसाहेब यांनी स्वतः फोन करून उध्दव ठाकरे यांना मनसे आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवत शेवटच्या दिवसाच्या दुपारपर्यंत मनसेच्या उमेदवारांचे ए-बी फॉर्म थांबवून ठेवले होते पण त्यावेळी पण शिवसेनेकडून किंवा उध्दव यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आजपर्यंत राजसाहेबांनी उध्दव ठाकरे व परिवारासाठी अनेकवेळा राजकारणात तडजोडी स्वीकारल्या पण उध्दव ठाकरे यांनी नेहमीच राज ठाकरे यांच्यावर टीका केली. सर्वात मोठा धक्का राजसाहेबांना तेव्हा बसला, जेव्हा अमित ठाकरे हे अतिशय मोठ्या अश्या दुर्धर आजाराने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना याच उध्दव ठाकरे यांनी मनसेचे सहा नगरसेवक पळवले. राजसाहेब जर उध्दव ठाकरे यांच्या जागेवर असते तर त्यांनी कधीच या नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला नसता, उलटपक्षी उध्दव ठाकरे यांना फोन करून सांगितले असते की, तुझे नगरसेवक माझ्या पक्षात येत आहेत तर त्यांचे काय म्हणणे आहे ते एकदा समजून घे. आमदारकीचे तिकीट मिळत नाही म्हणून याअगोदर पण इतर पक्षाचे आमदार व पदाधिकारी मनसेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतानासुद्धा संबंधित पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांनी फोन करून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे त्यांनी अनेकवेळा केले आहे. यासारखी अशी अनेक उदाहरणे देता येईल, जिथे राजसाहेब यांनी ठरविले असते, तर आलेल्या अनेक राजकीय संधीचा फायदा घेत आपले राजकीय मनसुबे पूर्ण करू शकले असते. पण शेवटी ते राजसाहेब आहेत. "राजकारणाच्या पलीकडले राजसाहेब... " हे उध्दव ठाकरे यांना कधीच कळले नाही.आज वरळीत जेव्हा पुत्राचा पराभव होताना दिसत असल्याने उध्दव ठाकरे यांना आता राजसाहेब ठाकरे यांनी केलेल्या पूर्वाश्रमीच्या पुण्याईची आठवण झाली आहे आणि त्यातून त्यांना उतराई व्हायची उपरती झाली आहे. पण हे सुध्दा करीत असताना उध्दव ठाकरे हे माहीम मध्ये उमेदवार अमित यांच्याविरुद्ध देत नसले तरी मनसेने पण वरळीत आदित्य विरुद्ध उमेदवार देऊ नये अशी अपेक्षा कशी काय ठेवू शकतात....?मागच्यावेळी जे झाले ते झाले...या अगोदर पण अनेक संधी मनसेने आणि पर्यायाने राजसाहेबांनी उध्दव ठाकरे यांना दिल्या पण त्याची जाणीव त्यांनी कधीच ठेवली नाही. स्वर्गीय बाळासाहेबांचे "हिंदुत्व" शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या दावणीला बांधून स्वतःला मुख्यमंत्री पद मिळावे याकरिता महाभकास आघाडी त्यांनी स्थापन केली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल आता संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाच आहे.महाराष्ट्रातील तमाम जनतेला आता फक्त एकमेव नेता जो महाराष्ट्राचा राजकारणाचा झालेला चिखल साफ करून "जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र नवनिर्माण" करू शकतो तो म्हणजे एकमेव राजसाहेब ठाकरे आणि मनसे पक्ष आहे याची जाणीव झाली आहे.म्हणूनच आज महाराष्ट्रातील तमाम जनतेने मनसेला एक संधी द्यायला हवी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.अमित ठाकरे यांना राजसाहेब ठाकरे यांनी या विधानसभेत आमदारकीचे तिकीट दिले तर ते नक्कीच १०० टक्के निवडून येतीलच.कारण अमित ठाकरे हे नेहमीच रस्त्यावर उतरून जनतेचे काम करणारे आणि प्रसंगी प्रशासनाला जाब विचारून धारेवर धरणार ठाकरे शैलीत तयार झालेले नेतृत्व आहे. आजपर्यंत त्यांनी संघटनेत आणि लोकांसाठी पक्षाच्या माध्यमातून अनेक विषय हाती घेऊन तडीस नेले आहेत.महाराष्ट्राच्या विधानसभेत "अमित"पर्व येण्यासाठी आता कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे आपले युवराज वरळी विधानसभेतून या निवडणुकीत मनसे उमेदवाराच्या विरुद्ध कसे निवडून येतील याचा उध्दव ठाकरे आणि युवराजने स्वतः विचार करावा.वरळी विधानसभेत असलेले मूळ प्रश्न म्हणजे वर्षानुवर्षे रखडेलेले एस आर ए प्रकल्प, बी डी डी चाळ पुनर्वसन, कोळीवाडा पुनर्विकास यामध्ये युवराज काहीच करू शकले नाहीतच, पण वरळी विधानसभेत फिरताना सुद्धा तमाम वरळीकर रहिवाश्यांना कधीच दिसले नाहीत. वरळीत तर यांचे सध्याच्या घडीला तीन आमदार असताना वरळीचा विकास का झाला नाही..? याचे साधे उत्तर यांच्याकडे नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत युवराजचा पराभव होणार हे निश्चित असल्यानेच आता राजसाहेब ठाकरे यांनी पूर्वी केलेल्या उपकारांची जाणिव यांना व्हायला लागली आहे. पण यामध्येही आपला धूर्त स्वार्थ लपला आहे ,हे समजण्या इतपत महाराष्ट्रातील जनता मूर्ख नाही.
म्हणूनच विधानसभेत "अमित"पर्व येण्यासाठी ऊबाठा गटाची मनसेला आवश्यकता नाही.
आपला
निलेश भोसले
नीलेश भोसले यांच्या फेसबुक पेज वरुन.....
No comments